शंभाजी नगर सिमेंट रोडवरील कामाचे भूमिपूजन करण्यात आले

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
गोंदिया:आमगांव तालुकातील रिसामा ( आमगाव ) येथील गोंदिया रोड ते शंभाजी नगर अंदाजे रक्कम १० लक्ष रूपये ,सिव्हिलाईन रोड अंदाजे रक्कम १० लक्ष रूपये रेणुका नगर अंदाजे रक्कम १० लक्ष रूपये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे एकूण रक्कम ३० लक्ष रूपये सिमेंट रोडवरील कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद गोंदिया यांचे हस्ते उपस्थित कमलबापू बहेकार आमगाव तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राजेश भक्तवर्ति, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, आमगाव टीकारामभाऊ मेंढे,माजी सभापती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,आमगाव रवि क्षिरसागर,शहर अध्यक्ष रा. का. पा. जियालाल पंधरे,माजी जिल्हा परिषद सदस्य,अनिल शर्मा,संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती, पियूष झा महाराज वरिष्ठ नेते राकपा सीमा शेंडे महिला अध्यक्षा,गेंदलाल यावलकर ओबीसी सेल अध्यक्ष प्रमोद शिवणकर माजी पं. स. सदस्य,तुलेद्र कटरे,रमन डेकाटे,माजी सरपंच श्रीखंडे सर,युवक राष्ट्रवादी काँग्रेस, धनिरामजी बिसेन, संचालक आदिवासी सेवा सहकारी संस्था सातगाव दिलीप महारवाडे,अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, किडगिपार व इतर सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.